समाजाचे दैनंदिन व्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत म्हणून कधी भीतीच्या, तर कधी नीतीच्या भिंती उभ्या केल्या जातात. समाज एकतर भीतीवर चालतो किंवा नीतीवर. हे एकदा मान्य केले की, त्याप्रमाणे माणसांच्या वर्तनाचे व्यवहार ठरत जातात. हे केले की तू चांगला आहेस; ते केलं की वाईट आहेस, असं सांगणं नियंत्रणाचा भाग झाला. समूहात वावरणाऱ्यांचे वागणे सर्वसंमत मार्गाने घडत राहावे, म्हणून विचारांत काही नीतीसंकेत कोरून घेणे व्यवस्थेचा भाग असतो. प्रासंगिक गरज म्हणून त्यांना अपेक्षित आकार देऊन सजवावे लागते. आखलेल्या चौकटीत विहार करायला कोणी राजी नसेल, तर त्यास पाप-पुण्य, धर्म-अधर्म वगैरे सारख्या गोष्टींची भीती दाखवून सत्प्रेरीत मार्गाने नेण्याचा प्रयत्न होत राहतो. कधीकाळी समाजात वावरणाऱ्या माणसांचे संबंध सीमित आकांक्षांच्या आवाक्यात असल्याने अशा गोष्टी सहज घडूनही...
सुखाची परिमाणे
माणूस इहलोकीचे नवल वगैरे आहे की नाही, माहीत नाही. माणसांमुळे इहतलास अर्थपूर्णता मिळाली असल्याचं कोणी म्हणत असल्यास त्यालाही विरोध असण्याचं कारण नाही. मग असे असेल, तर वसुंधरेचं वैभव बनून असणाऱ्या बाकीच्या गोष्टींचे मोल काहीच नसते का? धरतीवर जीवनयापन करणारे जीव विशिष्ट प्रेरणा घेऊन आयुष्य व्यतीत करत असतात. त्यांच्या प्रेरणा बहुदा देहधर्माशी निगडित असतात. माणूसही निसर्गाचंच अपत्य असल्याने त्यांच्या गरजा निसर्गक्रमाशी निगडित असणं स्वाभाविकच, पण यापेक्षाही थोडं अधिक काही असतं त्याच्याकडे. काही प्रेरणा असतात, काही प्रमेये, काही प्रयोजने, काही संस्कार, काही अनुभवही. मुळात माणूस आयुष्याचे पट रंगवत जातो, तो स्वप्नांना साकारण्यासाठी. याचा अर्थ सगळ्यांनाच मनी वसणारी मुक्कामाची ठिकाणे गाठता येतात, असा नाही. जगण्याला अर्थाचे अनेक आयाम असतात. काही भीतीचे...
बदल
काळ गतीची चाके पायाला बांधून पुढे पळत असतो. वाहत राहतो आपलेच किनारे धरून. त्याच्या वाहण्याला बांध घालता नाही येत. बदल ही एक गोष्ट अशी आहे, जी कधीही बदलत नाही. काळ काही कोणासाठी थांबायचं सौजन्य दाखवत नाही अन् बदल काही कोणाची प्रतीक्षा करत नाही. त्यांना टाळून मुक्कामाची ठिकाणेही कुणाला गाठता येत नाहीत. बदलांना सामोरे जाणे क्रमप्राप्त. पण बहुदा बरकतीची गणिते आखताना काही प्राधान्यक्रम ठरवले जातात. फायद्याचा परीघ संकुचित करणाऱ्या गोष्टींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं जातं. अर्थात, असे करण्यातही कुणाचातरी स्वार्थ असतोच. काळाचा कोणताही तुकडा यास अपवाद नसतो. वाट्याला आलेल्या तुकड्यात प्रत्येकाच्या आयुष्याची सूत्रे सामावलेली असतात. ती वैयक्तिक असतात, तशी सामुहिकही असतात. नियतीने हाती दिलेल्या तुकड्यांना घेऊन आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी मार्ग मात्र स्वतःच...