Dakhal | दखल

By // No comments:
Thumbnail
      दिनांक: 10 जुलै 2016, रविवार रोजी दैनिक देशदूत 'शब्दगंध' पुरवणीत प्रकाशित माझा ललित लेख: 'वारी.' धन्यवाद...! दैनिक देशदूत, जळगाव.  लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:  http://www.aksharyatra.com/2016/07/vaari.html   दिनांक: 2 जुलै 2016, शनिवार रोजी दैनिक लोकमत 'विकेंड' पुरवणीत प्रकाशित माझा ललित लेख 'सखा-सोयरा. 'धन्यवाद...! दैनिक लोकमत, जळगाव. लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: http://www.aksharyatra.com/2015/11/sakha-soyara.html?m=1...

Gun Ani Gunavatta | गुण आणि गुणवत्ता

By // 3 comments:
गुण आणि गुणवत्ता: भाग एक   दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल लागले. नवी उंची गाठणारे निकालांचे आकडे पाहणाऱ्या, ऐकणाऱ्याना सुखद अनुभव देऊन गेले. परीक्षार्थींच्या पदरी गुणांचे भरभरून दान पडले. रित्या ओंजळीतून आनंद ओसंडून वाहू लागला. वर्षभराच्या सायास-प्रयासांना यशाची फळे आली. अनेकांचे टांगणीला लागलेले श्वास मोकळे झाले. घेतलेल्या कष्टांचे चीज झाले म्हणून मुलं, त्यांचे पालक, शिक्षक, शाळा, शिक्षणव्यवस्था सगळेच सुखावले. सत्काराचे, कौतुकाचे, गुणगौरवाचे सोहळे पार पडले. मीडियातून सुहास्य वदनाच्या छबी चित्रांकित झाल्या. त्यादिवासाचा सूर्य मावळला तसा कौतुकाचा आलेला बहरही ओसरला. रात्रीच्या कुशीत माणसे निद्राधीन झाली. दुसऱ्या दिवसाचे दैनंदिन व्यवहार पोटपाण्याच्या दिशेने वळते झाले. निकालाच्या दिवसाच्या साक्षीने पार पडलेले कौतुकाचे सोहळे अनेकांच्या...

Haravalele Kahi | हरवलेले काही

By // 4 comments:
‘लहानपणी मी खूप श्रीमंत होतो, कारण पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात माझेपण दोनतीन जहाजे चालायचे. कागदाची का असेनात; मोकळ्या हवेत स्वतःची विमाने उडवायचो. चिखलाचा का असेना; पण स्वतःचा किल्ला असायचा. आता हरवली ती श्रीमंती अन् बालपणही.’ व्हॉट्सअपवर आलेला मॅसेज वाचला. त्यातले शब्द नकळत भूतकाळात घेऊन गेले. मनपटलावरची दृष्ये एकेक करून सरकू लागली. बालपणातल्या हरवलेल्या श्रीमंतीसह पुन्हा एकदा आठवणींच्या हिंदोळ्यावर मन झुलायला लागले. बालपणातील स्मृतींचा जागर घडत राहिला. मनाचा एक कोपरा स्पंदित झाला. ‘लहानपण देगा देवा’ वाक्याचा अर्थ नव्याने लावण्याचा मन प्रयत्न करू लागले. हातून काहीतरी निसटल्याची अस्वस्थता मनाच्या आसमंतात दाटून आली. आठवणींचे मळभ झाकोळून टाकायला लागले. बालपणातला काळ स्मृतींची सोबत करीत नव्याने जागा होऊ लागला. क्षणपळाची गणिते जुळवत काळ चालत...