वळणाचं पाणी रखेलीच्या पायी नवऱ्यानं सोडलं मला सौभाग्यवती असून त्यानं विधवा केलं मला जगावं असं काही राहिलं नव्हतं पोटाच्या तान्हुल्यासाठी जगावं लागत होतं लोकांची उष्टी काढून जीव थकून जायचा वाढत्या पोराला पाहून ताजातवाना व्हायचा कुणी वाहिनी तर कुणी ताई म्हणायचे नजरेत मात्र त्यांच्या वेगळेच भाव असायचे त्यांच्या नुसत्या नजरेने मनाला बलात्काराच्या वेदना व्हायच्या तशाच शारीरिक भावनाही जागृत व्हायच्या कारण पोटाला उपाशी राहण्याची सवय झाली होती शरीराला अजून व्हायची होतीपण मोहाला बळी पडायचे नसते शील जिवापलीकडे जपायचे असते असा ठाम होता निर्धार म्हणूनच खडतर वाट झाली पार पोरगं माझं मोठं होत गेलं मीही भूतकाळ विसरून वर्तमान करपवून भविष्याकडे वाट लावून बसले होते आणि इथेच माझे चुकले होते ज्याला जीव लावला त्यानेच जीव घेतला तोही एक पोरीला घेऊन पळून गेला मला...
कविता समजून घेताना... भाग: बावीस
वस्ती आणि मोहल्लासकाळ उजाडली की,वस्ती आणि मोहल्ल्याचामध्येच वाहणारानाल्याचा पुल ओलांडूनअहमद मामूनान पाव, बन पाव अन् बटर पावआणि अशाच सटरफटर वस्तूविकायला यायचातेव्हा साऱ्या वस्तीचा दिवसचाय पावने सुरू व्हायचासारं अंग तेलकट मळकट केलेलाआणि कळकट कपडे घातलेलामुख्तार चाचाडोक्यावर मोठं टोमलं घेऊन‘पप्पड ले लो... पप्पड ले लो...’म्हणत भले मोठे तेलकट पापड विकायचासारी कळकट मळकट पोरंचार-चाराने घेऊन त्याच्या भवती जमा व्हायचीआणि समदं टोपलंच्या टोपलंसुपडं करून जायची,‘दौ रूप्पे में बारा...’ ओरडतआशाखाला केले विकायला यायचीआमच्या सिझनमध्येगुठली के दाम विकून सारीपाटी झटकून जायचीदिवसातून दोनदा तरीराजूचाचाच्या रंगीबेरंगी बिल्लोरच्या किणकिणाटातबाया रमायच्या घंटाभर तरी,आपलं मनगट सोपवायच्यात्याच्या हवाली बिनधास्तबिल्लोर टिचला की हातातलं रक्तहीत्या पदरानं हलकेच टिपून...
कविता समजून घेताना... भाग: एकवीस
लक्षात ठेव पोरीलक्षात ठेव पोरी तू तुकडा आहेस काळजाचाविपरीत काही घडलं तर जीव जाईल आमचातुला घराबाहेर पाठवायला मन आमचं धजत नाहीपण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं असही वाटत नाहीतळ हातावरच्या फोडाप्रमाणेजपलयं तुला काळजीनेजाणिव ठेव त्याची आणि झेंडा लाव तुझ्या यशाचाउच्छृंखल, धांदरट राहू नकोसस्वप्नात उगीच गुंतू नकोसआरशापुढे उभं राहूनवेळ वाया घालू नकोसमोहात कसल्या पडू नकोसअभ्यास करण्या विसरु नकोसपैसे देवूनही मिळणार नाहीतुझा वेळ आहे लाख मोलाचामन जीवन तुझं कोरं पानत्यावर कुणाचं नांव लिहू नकोसस्पर्श मायेचा की वासनेचाभेद करण्यात तू चूकू नकोसमोबाईल, संगणक आवश्यकचत्यांच्या आहारी जावू नकोसपरक्यांवर विश्वास करू नकोसअनादर नको करू गुरूजनांचादेहाचं प्रदर्शन करण्यासाठीसंस्कार, कपडे टाकू नकोलाज वाटेल असं काही करण्यासाठीचेहरा उगीच झाकू नकोचुकांना येथे नसतेच कधी माफीगेलेली...