Gandhkoshi | गंधकोशी

By // 6 comments:
गंधकोषी: भाग दोन ‘पौगंडावस्था वादळी अवस्था असते’, असा एक प्रश्न बीएड, डीएडचा अभ्यास करताना शैक्षणिक मानसशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत हमखास असायचा. तो येणारच म्हणून कितीतरी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी शिक्षक या प्रश्नाच्या उत्तराचे शब्दनशब्द पाठ करून घ्यायचे. यातील बरेच जण उत्तरपत्रिकेत त्या प्रश्नाचं उत्तर लिहून उत्तम गुण मिळवीत उत्तीर्ण झाले असतील. त्यातले काही शिक्षक झाले असतील. पण यातील कितीजण जे शिकले आणि परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत लिहलं, ते शिकवतांना प्रयोगात आणू शकतात? सांगणे अवघड आहे. अशा वयातील मुलांना सांभाळताना शिक्षकाचं सारं कौशल्य पणास लागतं. त्याच्याकडे असलेल्या, नसलेल्या ज्ञानाचा कस लागतो. पण हेही वास्तव अधोरेखित करावयास हवे, यातील किती शिक्षक मुलांच्या वर्तनात परिवर्तन घडवण्याकरिता स्वयंप्रेरणेने आणि स्वयंप्रज्ञेने निर्णय...

Gandhkoshi | गंधकोशी

By // 5 comments:
गंधकोशी: भाग एक काही दिवसापूर्वी शाळेतील मुलांसंदर्भात बातम्या- जळगाव जिल्ह्यातील गिरड येथील शाळेत मुलांच्या आपापसातील भांडणात पाचवीच्या मुलाने जीव गमावला. संगमनेर तालुक्यातील राजापूरच्या शाळेत सातवीतील मुलांनी सोबत शिकणाऱ्या आपल्याच वर्गातील मुलास मुलींकडे पाहतो, म्हणून बदडून काढले. मारहाणीत त्या मुलाचा मृत्यू झाला. जीवनाचे पैलूच ज्यांना अजून पुरते कळायचे आहेत; त्या मुलांच्या जगात हे काय अतर्क्य घडतंय, म्हणून सारेच अवाक झाले. अनेकांच्या चेहऱ्यावर चिंतेची अस्पष्टशी लकेर उमटली. प्रत्येकाने आपापल्यापरीने संबंधित घटनेचे अर्थ शोधले. अन्वयार्थ लावले. संबंधित बातम्या लोकांपर्यंत पोहचल्या. काही संवेदनशील मने क्षणभर अस्वस्थ झाली. हे काय विपरीत घडतेय म्हणून विचार करायला लागले. घडणाऱ्या अशा घटनांचा अन्वयार्थ लावणे जरा अवघडच असते, कारण अशा घटनांशी...

Gun Aani Gunvatta | गुण आणि गुणवत्ता

By // No comments:
गुण आणि गुणवत्ता: दोन  परीक्षातंत्राला आत्मसात करून गुणांचं मोठ्ठं भांडार आपल्या खात्यावर जमा करण्याचा छंद असणाऱ्या जवळपास सगळ्या ‘मार्क्स’वाद्यांनी डॉक्टर, इंजिनियर व्हायची स्वप्ने जणूकाही लहानपणापासून आपल्या मनावर गोंदून ठेवलेली असतात. कौतुकसोहळ्याच्या निमित्ताने या गुणवंतांना वर्तमानपत्रात मनोगते व्यक्त करण्याची संधी अनायासे प्राप्त होते. बरं येथे विचारले जाणारे प्रश्नही जवळपास दरवर्षी तेच किंवा तशाच स्वरूपाचे असतात आणि उत्तरेही जणूकाही मागचीच पाठ करून ठेवल्यासारखी. यांचं रोज बारा-तेरा तास अभ्यास करणं, टीव्ही वगैरे न पाहणं, शिक्षकांचं, आईबापाचं यांना सतत मार्गदर्शन असणं आणि सोबत अनेक पुस्तके दिमतीला असल्याचे हे सांगतात. हे पाहून तर आमच्यासारख्या हंगामी अभ्यास करणाऱ्या पिढ्यांना गरगरायला होते. बरं यातील सगळ्याच गुणवंताना डॉक्टर, इंजिनियर...