कविता समजून घेताना... भाग: पंधरा

By // No comments:
बाईचं सौभाग्यपहिलं न्हाणं आलं तेव्हाआईनं घेतली होती भुई सारवून हिरव्यागार शेणानंपोतरली होती चूल गढीच्यापांढऱ्या मातीनंअन्पाटावर बसवून घातली होती डोक्यावरून आंघोळपाच सवाष्णी बोलवून भरली होती खणानारळाने ओटीपोर वयात आल्याचा आनंदतिच्या चेहऱ्यावर मावत नव्हताआणि आज आरश्यात बघितले की पांढरं आभाळ चिरत जातं खोलवर काळीजमळवटभरली बाई जाताना बघितली भरदुपारी देवदर्शनाला की,तिला बघून केवढा आनंद वाटायचा तेव्हाआता लांबूनच देते मी तिला मनोमन आशीर्वादअन् माझी पडू नाही सावली तिच्यावरम्हणून दूरूनच करते वाकडी वाटआई म्हणायची,बाईनं मुंड्या हातानं अन् रिकाम्या कपाळानं करू नाही स्वयंपाकपाणीपारोश्या अंगाने वावरू नाही घरभरहीच सांगावांगी पुढे नेत मीही घालते आतामाझ्या पोरींना हातात बांगड्या अन्रेखते कपाळावर लाल रंगशेताच्या बांधावरून जाताना हात जोडून म्हणतेसाती आसरांना,येऊ...

कविता समजून घेताना... भाग: चौदा

By // No comments:
 गुऱ्हाळयंदाची उचल पोरीचं लगीन करायला मागील उचल अधिक यंदाची उचल शिलकीची वजाबाकी वाढतच जायची भूक शिल्लक ठेऊनसन वार न्हायपण ऊसतोडीची वाट आणि मुकादमाची उचलभुकेच्या मुक्कामी पोचायची न्हायधडूतं एखादं, हातराया बारदाणी,काटवट, तवा, पाण्याची घागर आणि लाकडी पेटी हाच काय तो रिता रिता संसार गाठीला बांधून भूक गारठून जावी असं जगणं परतून जातांना गावकुसात भूक उपाशीच भुकेलाही भूक असते बरं जशी तहानेला पाण्याची माणसाला श्वासाची मातीला नात्यांची फुलांना सुगंधाची पायांना उंबऱ्याची आणि देहाला देहाची तशी पाल्हा पाचोळ्याचं जीणंनाही वेदनांना उणंजसं ऊस गेल्यावर होतं शिवाराचं गाणं आणि गुऱ्हाळाचं चुलवाणात हताश होऊन खोल खोल बघणंप्रा. सुनिल तोरणे*माणूस शब्दाभोवती अर्थाचे जसे अनेक आयाम असतात, तसे त्याच्या जगण्याभोवती अनेक प्रश्नचिन्हेही अंकित झालेली असतात. मर्यादांची...