Sairat : Akalan Ani Anvay | सैराट: आकलन आणि अन्वय

By // 12 comments:
  चित्रपट समाजमनाचा आरसा असतो, असे म्हणतात. आरशात आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते, पण हेही सत्य की, समोर जे असेल आणि जसे असेल तसेच आरसा दाखवेल. त्यावर अविवेकाची काजळी पसरली असेल, तर विचारांची प्रतिमा सुस्पष्ट दिसेल तरी कशी? समाजात दिसतं, घडतं ते दाखवायचा प्रयत्न चित्रपट करतो. समजा ते काल्पनिक असेलही, पण भविष्यात असे काही घडण्याची शक्यता नाहीच, असे आपण म्हणू शकतो का? समाजाकडे हे समजण्याइतकी प्रगल्भता नसावी का? विचार करण्याचं दान नियतीने साऱ्यांच्या ओटीत ओतले असेल, तर संदेहाचे प्रश्नच का उरावेत? भारतासारख्या खंडतुल्य राष्ट्राचा ल.सा.वि. काढणे अवघड आहे, हे माहीत असणारी माणसे अपरिपक्व विचारांनी वर्तने असंभव. देशात जातीयता, धार्मिकता, भेदाभेदाच्या पलीकडे विचार करणारे आहेत, तसे विशिष्ट विचारांच्या वर्तुळात वर्तणारेही आहेत.....   चित्रपट...

Vaari | वारी

By // 19 comments:
  गेल्या सहा-सातशे वर्षापासून महाराष्ट्रातील माणसे आषाढी-कार्तिकीला वारीच्या वाटेने चालत आहेत. संसारातील समस्या, सुख-दुःख सारंकाही विसरून विठ्ठलाच्या ओढीने न चुकता वारीला जात आहेत. चंद्रभागेतील पाण्याच्या स्पर्शाने पुलकित होत आहेत. पंढरपूरला गेल्यावर विठ्ठलाची भेट व्हावी. त्याच्या पायी क्षणभर माथा टेकवावा, अशी अपेक्षा त्यांच्या मनात असतेच. पण एवढे करूनही विठ्ठलाचे दर्शन नाहीच झाले, तरी यांच्या मनात कोणताही राग नाही आणि तसा आग्रहतर नाहीच नाही. तेथे जावून नुसत्या कळसाचे दर्शन झाले तरी आत्मीय समाधान त्यांच्या अंतर्यामी विलसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे सगळे भक्त का करीत असावेत एवढे सव्यापसव्य? का करीत असावेत एवढे सायासप्रयास?...   वैशाखाच्या वणव्याने आसमंत होरपळून निघत असतं. सृष्टीतील साऱ्या जिवांची काहिली सुरु असते. सगळ्यांना...