आनंदाची नक्षत्रे

By // No comments:
दिनदर्शिकेच्या पानावरील २०२१ अंक बदलून त्याजागी २०२२ आसनस्थ होईल. कालचक्राचा एक छोटासा तुकडा, जो मोजण्याच्या सोयीसाठी केला आहे, तो संपेल. क्षणाला लागून आलेल्या पुढच्या क्षणाच्या कुशीतून नव्या क्षणांचे आगमन होईल. तोही पुढच्या क्षणाला जुना होईल. काळ आपल्याच नादात आणखी काही पावले पुढे निघून गेलेला असेल. वर्तमानात त्याला आठवताना फक्त स्मृतिशेष संदर्भ समोर येत राहतील. भविष्याच्या पटलाआड दडलेल्या आनंदाची नक्षत्रे वेचून आणण्याच्या कांक्षेतून काहींनी संकल्पित सुखाचें साचेही तयार करून घेतलेले असतील. ते हाती लागावेत म्हणून काही आराखडे आखून घेतले असतील. त्यांच्या पूर्तीसाठी शोधली जातील काही आवश्यक कारणे. काही अनावश्यक संदर्भ. घेतला जाईल धांडोळा निमित्तांचा. माणूस उत्सवप्रिय प्राणी असल्याने सणवार साजरे करण्यासाठी कोणतीतरी निमित्ते शोधतच असतो. तेवढेच...

काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे

By // No comments:
माणूस नावाचा प्रकार समजून घेणं जरा अवघडच. तो कळतो त्यापेक्षा अधिक कळत नाही हेच खरं. अर्थात यात नवीन ते काहीच नाही. कितीतरी काळापासून तो हेच किनारे धरून वाहतो आहे. ना त्याच्या वाहण्याला प्रतिबंध करणारे बांध बांधता आले, ना प्रवाहाला अडवता आलं, ना अपेक्षित मार्गाने वळवता आलं. नितळपण अंतरी नांदते राहणे माणसांची सार्वकालिक आवश्यकता आहे, याबाबत कुणाच्या मनात कोणताही किंतु असण्याचं कारण असेल असं वाटत नाही. नितळपण जगण्यात विसावलं की, निखळ असण्याचे एकेक पैलू कळत जातात. विश्वात वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तोंडवळा निराळा असला, तरी अंतरीचा भाव आगळा कसा असेल? उमदेपण धारण करून असणारी माणसे मानवकुलाचं वैभव असतात, धवल चारित्र्याचे धनी अन् विमल विचारांनी वर्तनारी गुणी माणसे विश्वाची दौलत असतात. हे किंवा असं काहीसं म्हणणं कितीही देखणं वगैरे वाटत...

मोहरून येण्याचे ऋतू

By // No comments:
झाडंपानंफुलं मोहरून येण्याचा आपला एक ऋतू असतो. तो काही नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो. ना त्याचं ते प्राक्तन असतं. काळाचे किनारे धरून निसर्ग वाहत राहतो अनवरत. कुणाच्या आज्ञेची परिपत्रके घेऊन नाही बहरत तो कधी. कळ्या उमलतात, परिमल पसरतो, सूर्य रोज नव्या अपेक्षा घेऊन उगवतो, रात्रीच्या कुशीत उमेद ठेवून मावळतो. अंधाराची चादर ओढून पडलेल्या आकाशाच्या अंगाखांद्यावर नक्षत्रे खेळत राहतात. आभाळातून अनंत जलधारा बरसतात. वळणांशी सख्य साधत नदी वाहते. पक्षी गातात. मोसम येतात अन् जातात. कळ्यांचे कोश कोरून फुलं उमलतात, ते काही त्यांचं नशीब असतं म्हणून नाही. स्वाभाविकपणाच्या वाटेवरून घडणारा प्रवास असतो तो. निसर्ग निर्धारित मार्गाने चालत राहतो. ना तो कोणाच्या कांक्षेच्या पूर्तीसाठी घडणारा प्रवास असतो, ना कोणाच्या इच्छापूर्तीसाठी केलेला प्रयास, ना कोणाच्या...

तर्काची तीर्थे

By // No comments:
शब्दांना असणारे अर्थ प्रघातनीतीचे परीघ धरून प्रदक्षिणा करत असतात की, त्यांना त्यांचं स्वतःचं अस्तित्व असत? की काळाच्या ओघात ते आकारास येतात? विशद करून सांगणं अवघड आहे. कोशात असणारे अर्थ अन् आयुष्यात येणारे त्यांचे अर्थ सारखे असतीलच असे नाही. कोणीतरी कोरलेल्या वाटांनी चालणं अन् आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देत प्रवास करणं यात अंतर असतंच. भावनांनी घातलेली साद अन् तर्काला दिलेला प्रतिसाद यात तफावत असतेच. तर्काच्या मार्गाने चालताना आसपासची विसंगती लक्षात घेता येते त्यांना बदलाच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. डोळसपणे घडणारा प्रवास असतो तो. डोळस असण्याचे अर्थ अवगत झाले की, त्याला अनुलक्षून नियोजन घडते. कधी-कधी नियोजनाचे अर्थही चुकतात. चुका घडून नयेत, असे नाही. पण त्या स्वभावदत्त असतील, केवळ स्वतःचे अहं कुरवाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कवायतीमुळे...

प्रमादाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा

By // No comments:
जगतात तर सगळेच. पण जगण्याचे सोहळे सगळ्यांनाच नाही करता येत. आयुष्य साऱ्यांच्या वाट्याला येतं, पण त्याला आनंदयात्रा करणं किती जणांना अवगत असतं? जीवन काही वाहत्या उताराचं पाणी नसतं, मिळाली दिशा की तिकडे वळायला. त्याला अपेक्षित दिशेने वळते करण्यासाठी वाटा शोधाव्या लागतात. त्यांची वळणे समजून घ्यावी लागतात. ती समजून घेता यावीत म्हणून पावलं योजनापूर्वक उचलावी लागतात. परिस्थितीचे अवलोकन करीत जगण्याची दिशा निर्धारित करावी लागते. काही आडाखे बांधायला लागतात. काही आराखडे तयार करून घ्यायला लागतात. काही गणिते आखायला लागतात. काही सूत्रे शोधायला लागतात. शक्यतांचा शोध घ्यावा लागतो. अंगीकारलेल्या भूमिका तपासून बघायला लागतात. असतील योग्य तर विचारांशी पडताळून पाहायला लागतात. राहिले असतील काही किंतु तर आपल्या विचारविश्वातून विलग करायला लागतात. पण याचा अर्थ असाही...