Gunta | गुंता

By // 12 comments:
गेल्या काहीवर्षापासून मनात वसतीला असलेलं स्वप्न पूर्ण होण्याच्या समीप आलं. मनाच्या गाभाऱ्यात जतन करून ठेवलेल्या संवेदनांना समाधानाचे पंख लाभत होते. चाकोरीतल्या वाटा धरून चालणाऱ्या घराच्या अस्तित्वाची मुळे अनपेक्षित आघातांनी अनेकदा हादरली, पण अंतर्यामी अधिवास करून असणाऱ्या आस्थेने त्यांना हात धरून सांभाळले. आल्या प्रसंगांना तोड देत कुटुंबातील माणसे आपलेपण टिकवून होती. मातीशी जुळलेली मने मातीतून आपलेपण शोधत राहिली. आपला वकूब तपासत, परिस्थितीने पुढ्यात आणून ठेवलेल्या प्रत्येक वळणाला पार करण्यासाठी प्रयत्न करीत राहिले.शेतकरी म्हणून ओळख देताना समोरच्याच्या नजरेत घरचा वकूब प्रश्नचिन्ह बनून अधोरेखित होत असे. सगेसोयरे आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायला कधी विसरत नसत. वाट्यास आलेली जमीन ओलिताखाली आली की, आपले दिवस पालटतील. दूरदूर धावणारे सुखाचे चांदणे...