“सर, समाजाचा संयम सुटत चालला आहे, असे नाही का वाटत तुम्हांला?” चर्चेत सहभागी होत माझा एक सहकारी बोलता झाला. त्याच्या बोलण्यावर आमच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियेची पळभरही प्रतीक्षा न करता तसाच पुढे व्यक्त होऊ लागला. मनात साठवून ठेवलेलं काही कुणाकडे सांगायचंच असेल कदाचित त्याला. व्यक्त होण्यासाठी यानिमित्ताने योगायोगाने हाती एक धागा सापडला. त्यास पुढे वाढवत तो बोलू लागला, “समाजातील दैनंदिन व्यवहारांचे प्रवाह आत्मकेंद्रित मानसिकतेकडे वाहत आहेत, असे नाही का तुम्हां लोकांना वाटत? सहज, साधेपणाने जगण्याची आणि आपण सुखाने जगताना इतरांविषयी आस्थापूर्वक विचार करण्याची कुणाला गरज नाही, असंच सगळ्यांना वाटतंय की काय कोण जाणे, माहीत नाही; पण माणसांचं असंच वागणं असेल, तर मला नाही वाटत माणसांच्या जगण्याला फारकाळ संयमाच्या सीमांमध्ये सावरून ठेवता येईल.” एका...